धुळे- केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) हे आज ( शुक्रवार ) धुळे शहर दौऱ्यावर ( Nitin Gadkari On Dhule Tour ) आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम, प्रकल्पांचे उद्घाटने, कार्यारंभ होवून राजर्षी छत्रपती शाहू नाट्यमंदिरात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी येत्या तीन वर्षात धुळे जिल्ह्यातील रस्ते हे अमेरिकेच्या दर्जाचे असतील असे आश्वासन दिले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 'टोल भरण्याचे टेन्शनच संपून जाईल' -धुळ्यात येणाऱ्या काळात मी टोल नाके बंद करून जीपीएस यंत्रणा उभी करणार आहे. त्यामुळे टोल भरण्याचे टेन्शनच संपून जाईल. हेच नंदुरबार व धुळे जिल्ह्यात करायचे आहे. याच दृष्टीने येत्या तीन–चार वर्षात दोन्ही जिल्ह्यातील रस्ते हे अमेरिकेच्या दर्जाचे असतील असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी धुळ्यात बोलताना दिले.
'जनता त्यांच्यावरच विश्वास ठेवते' - धुळ्यात आल्यावर माझे मन शांत होते, कारण खासदार डॉ. सुभाष भामरे यांना जी काम सांगितले होती, ती कठीण होती. सुलवाडे जामफल योजना पूर्ण झाली. या योजनेचे काम पूर्ण झाल्याने माझ्या डोक्यावरील ओझे कमी झाल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. दुसरे म्हणजे धुळे शहरातील रस्त्यांच्या प्रस्तावावर बोलताना नितीन गडकरी यांनी खोचक टीका करत वक्तव्य केले की, धुळे शहरात कॉन्ट्रॅक्टरला ठेका दिला की तो दिवाळखोरीत जातो, त्यामुळे मला टेन्शन येते की ऑर्डर देऊनही कामे होत नाहीत. हे काम सर्व काम पुन्हा सुरू झाले आहे त्यामुळे मला आनंद आहे. राजकारणात खोटी आश्वासन देऊन लोकांना मुर्ख बनवू शकत नाही, जे नेते खोटे स्वप्न दाखवितात त्यांच्याबद्दल तात्पुरता प्रेम असते आणि जे स्वप्न पूर्ण करून दाखवतात. जनता त्यांच्यावर विश्वास ठेवते असे म्हणत नितीन गडकरी यांनी काहींचे कान देखील यावेळी टोचले.
हेही वाचा -Khervadi Police Notice To Rana : मुंबई पोलिसांची राणा दाम्पत्याला नोटीस; '...तर तुम्ही जबाबदार'