धुळ्यात उद्धव ठाकरे यांची सभा सुरू
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची काही वेळात धुळ्या सभा होणार आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी
उद्धव ठाकरे यांची धुळ्यात सभा
धुळे - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा पार पडणार आहे. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांचे धुळे शहरात आगमण होणार आहे. धुळे शहरातील जेल रोड येथे सभेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार हिलाल माळी यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी.
Last Updated : Oct 12, 2019, 2:51 PM IST