महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 2, 2019, 7:31 PM IST

ETV Bharat / state

धुळ्यातील 'U' आकाराचे धरण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरसह पश्चिम पट्ट्यात गेल्या ६ दिवसांपासून जोराचा पाऊस पडत आहे.त्यामुळे पिंपळनेर येथील यु आकाराचे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, येथे पर्यटकांची गर्दी वाढत आहे.

धुळे येथील यु आकाराचे धरण पुर्ण भरले आहे

धुळे - जिल्ह्यातील पिंपळनेर येथील 'यु' आकाराचे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. हे धरण पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

धुळे येथील यु आकाराचे धरण पुर्ण भरले आहे
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरसह पश्चिम पट्ट्यात गेल्या ६ दिवसांपासून जोराचा पाऊस पडत आहे. पिंपळनेरच्या लाटीपाडा धरणाने गेल्या वर्षी तळ गाठला होता. यावर्षीही पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती. सध्या पश्चिम पट्ट्यातील शेंदवड भवानीच्या पायथ्यापासूनच सर्वत्र चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे लहान-मोठे नाले व बंधारे ओसंडून वाहत आहेत. पांझरा नदीच्या पाणी पातळीत जलद गतीने वाढ होत असल्याने लाटीपाडा धरणात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या ५ दिवसांच्या पावसाने धरण अर्धे भरले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details