धुळे - जिल्ह्यातील साक्री पिंपळनेर रस्त्यावरील शेणपूर फाट्यावर मोटारसायकल आणि ट्र्क यांच्यात झालेल्या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला असून तिसरा जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीसह मृतांचे पार्थिव साक्री ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला असून तो पिंपळनेर पोलीस ठाण्यात गेला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
धुळ्यातील साक्री पिंपळनेर रस्त्यावर अपघात, 2 जणांचा मृत्यू - धुळे अपघात बातमी
मृतांसह जखमींना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर ट्रकचालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पिंपळनेर पोलीस ठाण्यात गेला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथून साक्रीकडे जाणारा एमएच-१० ए डब्ल्यू ७३०७ क्रमांकाचा ट्र्क शेणपूर फाट्यावर आला असता साक्रीहून पिंपळनेरकडे जाणारी एमएच-१८ एएम-६५९२ ही मोटारसायकल चालकाच्या बाजूने ट्रकवर आदळली. यावेळी ट्रकचालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत मोटारसायकलवरील दोघे फेकले जाऊन दोघे ट्रकच्या पुढील चाकाखाली येऊन मरण पावले होते, तर तिसरा गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर ट्रकचालकाने ट्रक सोडून विरुद्ध दिशेने पलायन केले. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतांसह जखमींना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर ट्रकचालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पिंपळनेर पोलीस ठाण्यात गेला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.