धुळे -शहरात पुन्हा दोन रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत. व्यसनामुळे दोन दिवसांपूर्वी मृत्यू झालेला तरुण कैदी पाॅझिटिव्ह तर गर्भवती महिलाही पाॅझिटिव्ह आढळली आहे. धुळे शहरातील रुग्णसंख्या आता ५६ इतकी झाली आहे.
धुळे जिल्ह्यात ६६ कोरोनाबाधित, प्रशासनासमोर संसर्ग रोखण्याचे आव्हान - धुळे कोरोना न्यूज
आत्तापर्यंत धुळे जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून 18 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यात ६६ कोरोनाबाधित, प्रशासनासमोर संसर्ग रोखण्याचे आव्हान
धुळे शहरातील रुग्ण संख्या ५६ तर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६६ इतकी झाली आहे. धुळे जिल्ह्याची वाटचाल मालेगावच्या दिशेने सुरू असून वाढत्या रुग्णांची संख्या रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले आहे. आत्तापर्यंत धुळे जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून 18 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.