धुळे - शहरातील सोनगीरजवळ झालेल्या व्यापाऱ्याच्या खुनाचा तपास लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला अखेर यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात एकूण ४ जण असून मुख्य आरोपीसह दोघांना पथकाने ताब्यात घेतले आहे.
धुळ्यात पैशांच्या देवाणघेवाणीतून व्यापाऱ्याचा खून; २ जण ताब्यात - accuse
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिल्यावर रस्ता लुटीतून हा प्रकार घडल्याचे लक्षात आल्यावर हा गुन्हा सोनगीर पोलिसांकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला. यानंतर तत्काळ स्वतंत्र पथके तयार करून गुजरात येथील अहमदाबाद, भरूच, इंदोर येथे पथके पाठविण्यात आली.
गेल्या ४ दिवसांपूर्वी धुळे शहराजवळील सोनगीरजवळ अहमदाबाद येथील गोपाल मोतीलाल काबरा हे सोनगीर दोंडाईचा रोडवरील हॉटेल धनश्रीजवळ मृतावस्थेत आढळून आले होते. प्रथम हा अपघात असल्याचा संशय पोलिसांना आला होता. मात्र, तपासाअंती हा खून झाल्याचे लक्षात आल्यावर तपासाची चक्रे फिरवली. या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिल्यावर रस्ता लुटीतून हा प्रकार घडल्याचे लक्षात आल्यावर हा गुन्हा सोनगीर पोलिसांकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला. यानंतर तत्काळ स्वतंत्र पथके तयार करून गुजरात येथील अहमदाबाद, भरूच, इंदोर येथे पथके पाठविण्यात आली.
या घटनेतील संशयित असलेल्या राजू उर्फ विहंग बिपीनचंद्र त्रिवेदी (रा. अटलदरा, बडोदा) हा एलसीबीत हजर झाला. त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मृत गोपाल काबरा आणि आरोपी राजू त्रिवेदी यांच्यात राजपिपला येथील एका जमिनीच्या व्यवहारातून पैशांची देवाणघेवाण होणार होती. त्या व्यवहारातील १० कोटी रुपये राजूने रोख देण्याऐवजी हिरे देऊन तो व्यवहार पूर्ण करण्यासाठी गोपाल काबरा यांना बोलवले होते. त्यानुसार गोपाल काबरा हे ३० मे रोजी पहाटे अडीचच्या सुमारास सोनगीर येथे हिरे घेण्यासाठी गेले. याठिकाणी राजू त्रिवेदीच्या वतीने कृष्णा गेंदालाल सोमानी (रा. बडोदा) हा त्या ठिकाणी आला. यावेळी त्याच्यासोबत ललित विजय पटेल आणि आणखी एक अनोळखी व्यक्ती होता. या तिघांनी गोपाल काबरा यांना सोनगीर दोंडाईचा रोडवरील हॉटेल धनश्रीच्या पुढे नेऊन त्यांच्या डोक्यात अवजड वस्तूने वार करत खून केल्याची कबुली या आरोपींनी पोलिसांना दिली. या प्रकरणी पोलिसांनी कृष्णा सोमानी याला देखील ताब्यात घेतले आहे.