धुळे - साक्री धुळे रस्त्यावरील हॉटेल रामसमोर आज सकाळी बस, ट्रॉली आणि पिकअपमध्ये तिहेरी अपघात झाला. अपघातात पिकअप चालक सुनील शांताराम मुसळे ( रा. पिंपळनेर ) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या दृश्यांच्या माध्यमातून या अपघाताची भीषणता समोर येते.
धुळ्यात तिहेरी अपघात, पिकअप चालक जागीच ठार - एसटी
मंगळवारी सकाळी जिल्ह्यातील साक्रीपासून एक किलोमीटर अंतरावर धुळे रस्त्यावर राम हॉटेलसमोर बस आणि ट्रॉली आणि पिकअपमध्ये तिहेरी अपघात झाला. यामध्ये पिकअप जागीच ठार झाला.
मंगळवारी सकाळी जिल्ह्यातील साक्रीपासून एक किलोमीटर अंतरावर धुळे रस्त्यावर राम हॉटेलसमोर बस आणि ट्रॉली आणि पिकअपमध्ये तिहेरी अपघात झाला. यामध्ये पिकअप जागीच ठार झाला. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
धुळ्याकडून मालेगाव ते साक्री (MH-१४, BT-०४१४) ही बस हाँटेल राम समोर थांबली असताना मागून येणाऱ्या ट्रॉलीने (GJ-५, AV-७०६७) साक्रीकडून धुळ्याकडे जाणाऱ्या पिकअपला (MH-४७, E-०९०१) धडक दिली. अपघात झाला त्याठिकाणी एसटीचा थांबा असल्यामुळे बस अचानक थांबली. त्यामुळे हा अपघात झाला, अशी माहिती उपस्थित नागरिकांनी दिली. नागरिकांनी अपघाताविषयी सांगितले, की एसटी बसने थांबा घेताना रस्त्याच्या खाली थांबणे आवश्यक आहे. परंतु नेहमी एसटी.चालक रस्त्यावरच बस थांबवतात म्हणून हा अपघात झाला. याठिकाणी वारंवार अपघात होतात, मात्र, या घटना थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे, असे मतही नागरिकांनी व्यक्त केले.