महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात तिरंगा रॅली - rally in dhule

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शहरातून 1 हजार 111 मीटर लांबीच्या तिरंग्याची रॅली काढण्यात आली.

रॅली
रॅली

By

Published : Jan 25, 2020, 6:51 PM IST

धुळे- प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शहरातून तब्बल 1 हजार 111 मीटर लांबीच्या तिरंगा ध्वजाची रॅली काढण्यात आली, या रॅलीने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले.

माहिती देताना पदाधिकारी


तरुण पिढीमध्ये राष्ट्राविषयी प्रेम निर्माण व्हावे. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने धुळे शहरातील एसएसव्हीपीएस महाविद्यालयातून 1 हजार 111 मीटर तिरंग्याची भव्य रॅली काढण्यात आली. ही रॅली शहराच्या विविध प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाली.

हेही वाचा - 'महाराष्ट्र बंद'कडे धुळेकरांनी फिरवली पाठ

यावेळी धुळे शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, देशभक्तीपर घोषणांनी तसेच या तिरंग्याच्या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

हेही वाचा - शिरपूरमध्ये घराचे छत अंगावर कोसळल्याने तरुणाचा मृत्यू, एक गंभीर

ABOUT THE AUTHOR

...view details