धुळे - जिल्ह्यात बुधवारी 7 जणांनी कोरोनावर मात केली असून, 11 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 452 झाली आहे. तर आतापर्यंत 285 जणांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारपर्यंत जिल्ह्यात 43 जणांचा मृत्यू झाला असून, उर्वरित 124 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने जिल्हा प्रशासनाच्यासमोर चिंता वाढली होती.
धुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 285, तर आतापर्यंत 43 रुग्णांचा मृत्यू
एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ झाली आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.
धुळे जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 285 तर आतापर्यंत 43 रुग्णांचा मृत्यू
एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ झाली आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. धुळे जिल्ह्यात मृत्यूदर देखील कमी झाला असून, यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. धुळे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. शिरपूरमध्येही कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात वाढली होती.
Last Updated : Jun 18, 2020, 12:12 PM IST