महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यात कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली 9 वर... - shirpur corona

शिरपूर तालुक्यातील अमोदे गावात कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला असून एका 40 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 9 वर गेली असून या आधी 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

corona virus
corona virus

By

Published : Apr 23, 2020, 10:17 AM IST

धुळे- जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 9 वर जाऊन पोहोचली आहे. तसेच शिरपूर तालुक्यातील एका चाळीस वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे.

धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील अमोदे गावात कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला असून एका 40 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 9 वर गेली असून या आधी 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात बुधवारी दिवसभरात 18 कोरोना संशयितांचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असून 52 जणांना होम क्वारटाईन करण्यात आले आहे, पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details