धुळे -जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, जिल्ह्यातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून आतापर्यंत 806 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
धुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 265 वर पोहोचली आहे. कोरोनाला हरवण्यासाठी जिल्ह्यातील प्रशासनाच्या वतीने विविध प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही जास्त प्रमाणात आहे. धुळेनंतर जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मात्र, आतापर्यंत जिल्ह्यात 806 जणांनी कोरोनावर मात केली आहे.