धुळे- शहरातील एका लोकप्रतिनिधीच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 3 वर गेली आहे.
धुळ्यात लोकप्रतिनिधीच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू, मृतांचा आकडा 3 वर
शहरातील एका लोकप्रतिनिधीच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
धुळ्यात लोकप्रतिनिधीच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू, मृतांचा आकडा 3 वर
धुळे शहरातील एका लोकप्रतिनिधीच्या भावाला कोरोनाची लागण झाली होती. या रुग्णावर भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी प्रकृती गंभीर झाल्याने सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबतची अधिकृत माहिती रुग्णालय प्रशासनाच्यावतीने देण्यात आली असून जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या 3 झाली असून यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या रुग्णाच्या निवासस्थान परिसर सील करण्यात आला आहे.