धुळे:जिल्ह्यात शुक्रवार पासून पावसाची (Rainfall review in Dhule district) संततधार सुरु होती . दोन दिवस तर पावसाचा जोर कायम होता . परिणामी जिल्ह्याचा पश्चिम पट्टा असलेल्या साक्री तालुक्यातील कान, पांझरा नदी दुथडी (Rivers also overflow in Dhule Dist) भरुन वाहू लागली . साक्री तालुक्याला या पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय. जिल्ह्यातील बारा जलप्रकल्पांपैकी पांझरा, मालनगांव, जामखेडी ही जल प्रकल्प ओव्हर फ्लो (Three water projects overflow in Dhule district) झालीत. मंगळवारी सकाळपासून पावसानं उसंत घेतल्यानं चार दिवसानंतर धुळे जिल्ह्यात सूर्य दर्शन झाले. एकीकडे या पावसामुळे काही अंशी नुकसान झाले असले तरी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झालीय. दरम्यान, धुळे शहरातील अशोक नगर जलकुंभ परिसरात असलेल्या रखवालदाराच्या निवास स्थानाचा स्लॅब कोसळला. सुदैवानं याठिकाणी कोणीही राहत नसल्यानं कुठलीही जीवित हानी झाली नाही .
नदी व जल प्रकल्प ओव्हर फ्लो:पाटबंधारे विभागाच्या आकडेवारी नुसार जिल्ह्यातील बारा जलप्रकल्पांपैकी पांझरा, मालनगांव, जामखेडी ही जल प्रकल्प ओव्हर फ्लो झालीत. जिल्ह्यातील जल प्रकल्पांमध्ये १२ जुलै अखेर ३५.८६ टक्के जलसाठा झालाय. गेल्या वर्षी हा जलसाठा केवळ २२.६१ टक्केच होता. पांझरा, कान नदीच्या उगम क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धुळे शहराच्या मध्यभागातून वाहणारी पांझरा नदी दुथडी वाहत आहे. कालिका माता मंदिराजवळ असलेला फरशी पुलावरून पुराचे पाणी गेलं असल्यानं हा पूल बंद करण्यात आलाय. नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत.