धुळे - जिल्ह्यातील 3 कोरोनाबाधितांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबाधित मृत्यूंची संख्या 34 वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर 10 टक्क्यांवर गेला आहे. गेल्या 2 दिवसात 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. यात अल्पवयीन तरुणांचा देखील समावेश असून, शहरात 15 जणांचा तर ग्रामीण भागात 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
धुळ्यामध्ये 3 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू - धुळे कोरोना अपडेट
धुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील ५० वर्षीय पुरुष (शिरपूर), ५२ वर्षीय पुरुष (शिरपूर) ६२ वर्षीय पुरुष या तीन कोरोनाबाधित रुग्णांचा आज सकाळी मृत्यू झाला.
धुळ्यामध्ये 3 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
धुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील ५० वर्षीय पुरुष (शिरपूर), ५२ वर्षीय पुरुष (शिरपूर), ६२ वर्षीय पुरुष या तीन कोरोनाबाधित रुग्णांचा आज सकाळी मृत्यू झाला असून, जिल्ह्यात आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यू दर 10 टक्क्यांहून अधिक झाला आहे. जिल्ह्यात 375 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 196 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.