महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 17, 2020, 11:33 AM IST

Updated : Jun 17, 2020, 11:59 AM IST

ETV Bharat / state

धुळे जिल्ह्यात एकाच दिवशी 32 जणांनी केली कोरोनावर मात

धुळे जिल्ह्यात मंगळवारी 17 कोरोना रुग्ण वाढले आहेत. तर, 32 जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. कालपर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 441 वर पोहोचली आहे.

Dhule Corona Update
धुळे कोरोना अपडेट

धुळे -जिल्ह्यात मंगळवारी तब्बल 32 जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, काल रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 441 झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात 278 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारपर्यंत जिल्ह्यात 42 जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित 121 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने जिल्हा प्रशासनाच्यासमोर चिंता वाढली होती. मात्र, एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ झाली आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. धुळे जिल्ह्यात मृत्यूदर देखील कमी झाला असून यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

धुळे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. शिरपूरमध्येही कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात वाढली होती.

Last Updated : Jun 17, 2020, 11:59 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details