महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे जिल्ह्यातील 30 जणांना एकाच दिवशी डिस्चार्ज; एकूण कोरोनाबधितांची संख्या 373 वर - धुळे कोरोना अपडेट

जिल्ह्यातील विविध रुग्णालयातील 30 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात जिल्हा रुग्णालय धुळे 5, उपजिल्हा रुग्णालय शिरपूर 4, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा 2, वैद्यकीय महाविद्यालय 19 जणांचा समावेश आहे.

Dhule corona update
धुळे कोरोना अपडेट

By

Published : Jun 13, 2020, 7:18 AM IST

धुळे - शुक्रवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत आणखी 8 रुग्णांची भर पडली असून जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 373 झाली आहे. तर शुक्रवारी विविध रुग्णालयातील 30 जणांना एकाच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला, जिल्ह्यात आता कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 196 झाली आहे.

धुळे जिल्हा रुग्णालय येथील प्राप्त 19 अहवालात 8 नवीन रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 373 झाली आहे. तर उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील 6 अहवालांपैकी 5 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 31 वर्ष वयाची महिला रुग्ण (रा. योगेश्वर कॉलनी), 27 वय असलेला पुरुष रुग्ण (गोविंद नगर), 45 वर्ष वय असलेला पुरुष रुग्ण (प्रोफेसर कॉलनी), 52 वर्ष वयाचा पुरुष (प्रोफेसर कॉलनी) आणि 22 वर्षांची तरुणी (गणेश कॉलनी).

उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील 5 अहवालांपैकी 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयातील 30 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात जिल्हा रुग्णालय धुळे 5, उपजिल्हा रुग्णालय शिरपूर 4, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा 2, वैद्यकीय महाविद्यालय 19 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 196 झाली असून 31 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर उर्वरित 146 जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील वाढत्या रुग्णांसोबत डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झाल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details