धुळे - नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात सातपुड्याच्या वन जमिनीवर अफूची शेती होत असल्याचे मागे आढळले होते. अनेक वेळेला पोलिसांनी कारवाई केली असलेली असली तरी पूर्णपणे या प्रकाराला थांबवू शकलेली नाहीत. मात्र, या कारवाईनंतर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याला अमली पदार्थांच्या लागवडीचे ग्रहण लागल्याची चर्चा पुन्हा समोर आली. धुळे जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगा गांजाच्या शेतीने बदनाम झालेला आहे. बऱ्याच वेळा हे अमली पदार्थ मुंबईत नेले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या अमली पदार्थांचे मुंबई कनेक्शन तर नाही ना याचा शोध लावण्याची गरज निर्माण झाली आहे.
नेहमिच्या पिकांमध्ये अंतर पिकात ही अफू गांजाची शेती केली जात असल्याने पोलिसांच्या नजरेत ही शेती पडत नाही. मात्र, हे अमली पदार्थ मुंबई, सुरत व पुणे अशा महानगरांमध्ये तर विक्रीसाठी नेले जात नाहीत ना याचा शोध लावणे गरजेचे आहे. धुळे जिल्ह्यात तर 2020 या वर्षात 35 अमली पदार्थांच्या कारवाया झाल्या आहेत. त्यात 3 कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. सातपुड्यातील वन जमिनींवर गांजाची शेती केली जात असल्याचे प्रामुख्याने समोर आले आहे. त्यामुळे मूळ मालक सापडत नाहीत. कृषी, वन, महसूल व पोलीस अशा चार विभागांना एकत्र मिळवून हे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सातपुड्यात गांजा व अफू लागवडीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच हे अमली पदार्थ मुंबईकडे नेली जात असल्याचे कारवाई देखील करण्यात आल्या आहेत. पोलीस याबाबत उघडपणे बोलत नसले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड होणार गांजा,अफू कुठे विकला जातो याचे उत्तर मात्र यंत्रणेकडे नाही.
धुळे जिल्ह्यात गेल्या काही वर्षातील अमली पदार्थांच्या कारवाई
वर्ष | दाखल गुन्हे | अटक संशयित |
2015 | 1 | 1 |
2016 | 2 | 2 |
2017 | 7 | 13 |
2018 | 9 | 11 |
2019 | 14 | 21 |
2020 | 35 | 54 |