धुळे - जिल्ह्यात भुरट्या चोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूर-सुरत या महामार्गालगतच्या एका शेतकऱ्याच्या शेतात कांदाची चाळ उभारलेली होती. त्या चाळीत सुमारे दीडशे क्विंटल कांदा होता. सध्या कांद्याला बाजारात चांगला दर मिळत असल्याने चोरट्यांनी या चाळीवर डल्ला मारला आहे.
हातातोंडाशी आलेला घास चोरट्यांनी हिरावून नेला -
जिल्ह्यातील कुसुंबा गावातील सुभाष शिंदे हे कांदा उत्पादक शेतकरी आहेत. शिंदे यांची कुसुंबा शिवारामध्ये नागपूर-सुरत महामार्गालगत शेती आहे. याच शेतीमध्ये त्यांनी कांदाचाळ उभारली आणि त्याठिकाणी सुमारे दीडशे क्विंटल कांदा साठवून ठेवला होता. कांद्याला बाजारात चांगला दर मिळत असल्याने ते हा विक्रीसाठी नेणार होते. मात्र त्याआधीच कांदाचाळीवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. कांद्या चाळीतून तब्बल 100 क्विंटल कांदा भोरट्या चोरट्यांनी चोरून नेला आहे. हातातोंडाशी आलेला घास चोरट्यांनी हिरावून नेल्याने सुभाष शिंदे यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या कांद्यातून दोन पैसे मिळतील, कर्ज फेडू या विचारात ते असताना चोरट्यांनी त्याच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे.
पंधरा दिवसात दुसरी घटना -