धुळे- शहरातील पांझरा नदीमध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा चोवीस तास उलटूनही शोध लागलेला नाही. अक्षय सोनवणे (वय 23) हा तरुण सोमवारी दुपारी वाहून गेला होता. राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे कर्मचारी त्याचा शोध घेत आहेत.
धुळ्यातील पांझरा नदी पात्रात वाहून गेलेला युवक अद्यापही बेपत्ता; शोधमोहीम सुरु - अक्कलपाडा धरण
पांझरा नदीमध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा चोवीस तास उलटूनही शोध लागलेला नाही. अक्कलपाडा धरणातील पाण्याचा विसर्ग पांझरा नदी पात्रात करण्यात आला. त्यामुळे पांझरा नदीला पूर आला आहे. फुलेनगर भागातील ब्रिज कम बंधारा येथे अक्षय सोनवणे पोहत होता. दरम्यान, अक्षय या पुरात वाहून गेला.
Breaking News
अक्कलपाडा धरणातील पाण्याचा विसर्ग पांझरा नदी पात्रात करण्यात आला. त्यामुळे पांझरा नदीला पूर आला आहे. फुलेनगर भागातील ब्रिज कम बंधारा येथे अक्षय सोनवणे पोहत होता. दरम्यान अक्षय या पुरात वाहून गेला. सोमवारपासून अक्षयचा शोध सुरू आहे. मात्र, 24 तास उलटून देखील त्याचा मृतदेह हाती लागलेला नाही. मंगळवारी देखील अक्षयचा शोध सुरू आहे.