महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यात बैलपोळ्यानिमित्त बाजारपेठा सजल्या; लाखो रुपयांची उलाढाल - BAIL POLA news dhule

भारतीय संस्कृतीमधील अत्यंत महत्वाचा असणारा पोळा सण शुक्रवारी साजरा होणार आहे. पोळ्यानिमित्त बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तू  शहरातील बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.

पोळ्यानिमित्त बाजारपेठ सजली

By

Published : Aug 29, 2019, 5:19 PM IST

धुळे- बैलपोळा सणानिमित्त शहरातील बाजारपेठा सजल्या असून बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. यंदा जिल्ह्यात पाऊस उत्तम झाला असल्याने पोळा सणाचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. यामुळे बाजारात शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच घरात पूजेसाठी लागणारे मातीचे बैलदेखील विक्रीसाठी बाजारात आले आहेत. मातीच्या बैलांपेक्षा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल

भारतीय संस्कृतीमधील अत्यंत महत्त्वाचा असणारा पोळा सण शुक्रवारी साजरा होणार आहे. पोळ्यानिमित्त बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तू शहरातील बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. यात रंग, झूल, घुंगरू, यांचा समावेश आहे. या वस्तू खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची बाजारपेठेत गर्दी झाली आहे. आपल्या सर्जा-राजाला सुंदररित्या सजविण्यासाठी प्रत्येक शेतकरी आतूर झालेला असतो. बैलांच्या शिंगांना रंगविण्यासाठी लागणारे रासायनिक आणि नैसर्गिक रंगदेखील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. रंगांच्या किमतीत यंदा १० ते १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. यामुळे व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details