धुळे- शहराजवळील मोहाडी गावात विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जाणारा शंभर किलो गांजा मोहाडी पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी पोलिसांनी २ जणांना ताब्यात घेतले आहे. जिल्ह्यात अवैधरित्या गांजाची विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली असून पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पाच लाख रुपये किमतीचा गांजा जप्त, मोहाडी पोलिसांची कारवाई - Dhananjay Dixit
धुळ्यातील मोहाडी गावात विक्रीच्या उद्देशाने घेऊन जाणारा १०० किलो १०० गॅम वजनाचा पाच लाख रूपये किंमतीचा गांजा मोहाडी पोलिसांची जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
धुळे शहराजवळील मोहाडी गावातील दंडेवालेबाबा नगरमधील घर क्र. ३२१ मध्ये राहणारा सागर चौगुले आणि त्याचा साथीदार दोघेजण गांजा साठवून त्याची पॅकिंग करून विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जाणार आहेत, अशी गुप्त माहिती मोहाडी पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने याठिकाणी छापा टाकून सागर मुरलीधर चौगुले आणि त्याचा साथीदार कालूचरण केडूचरण बेहरा या दोघांना ताब्यात घेतले आहे. याठिकाणहून ५ लाख रुपये किमतीचा १०० किलो १०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. धुळे जिल्ह्यात अवैधरित्या गांजाची साठवणूक आणि विक्री करण्याच्या घटना वाढल्या असून यावर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.