धुळे- शिरपूर तालुक्यातील अजनाड बंगला जवळ कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे. गावकऱ्यांच्या मदतीने आग विझविण्यात आली.
चालत्या कारने घेतला पेट, सुदैवानं जीवितहानी नाही - traffic
शिरपूर तालुक्यातील अजनाड बंगला जवळ कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
जळगाव येथील रामचंद्र शेवंदास विराणी हे त्यांच्या पत्नी व मुलीसोबत शिरपूर येथे काळूमातेच्या दर्शनासाठी सकाळी जळगाव येथून निघाले होते. सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्यांच्या स्विफ्ट डिझायर चार चाकी वाहनाने पेट घेतला. वाहनाला आग लागल्याचे समजताच वाहनातले सर्व जण बाहेर निघाले व काही क्षणात संपूर्ण गाडी जळून खाक झाली.
शहादा बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावरील अजनाड बंगला गावाजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे गाडीत बसलेले संपूर्ण कुटुंब भयभीत झाले होते. विशेष म्हणजे पाऊस सुरू असताना या वाहनाला आग लागली होती. यामुळे रस्त्यावरील सुमारे १ किमी पर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती. कारला आग लागण्याचे कारण समजु शकले नाही.