धुळे- जिल्ह्यात रविवारी (दि. 7 जून) रात्री तब्बल दहा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 248 झाली आहे. जिल्ह्यात दिवसागणिक वाढणारी संख्या ही चिंताजनक झाली आहे.
धुळे जिल्हा रुग्णालयातून रविवारी (दि. 7 जून) 2 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असून शिरपूर तालुका देखील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. शिरपूर तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या 62 झाली आहे. त्यात शिरपूर शहरातील 55 रुग्णांचा समावेश आहे.