धुळे- मुंबई येथे शिक्षकांवर झालेल्या लाठीचार्ज घटनेचा धुळ्यात शिक्षक संघटनेने निषेध नोंदवला. तसेच घटनेच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. शिक्षकांवर लाठीचार्ज करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्या पोलिसांचे निलंबन करण्याची मागणी शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत धुळे जिल्हा प्रशासनाला निवेदनही देण्यात आले.
शिक्षकांवरील लाठीचार्जचा शिक्षक संघटनेकडून तीव्र निषेध; धुळ्यात केली निदर्शने
मुंबई येथे आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु केले आहे. आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेचा शिक्षण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवण्यात येत आहे.
मुंबई येथे आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु केले आहे. गेल्या २० दिवसांपासून हे आंदोलन सुरु असून आंदोलनाला सोमवारी गालबोट लागले. याठिकाणी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेचा शिक्षण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर निषेध नोंदवण्यात येत आहे. विशेष म्हणजे गेल्या २० दिवसात राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी या आंदोलनाची दखल देखील घेतली नाही. या घटनेच्या निषेधार्थ धुळे शहरातील धुळे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.