धुळे: मुख्याध्यापकाच्या सांगण्यानुसार एका सहाय्यक शिक्षकाने त्याच शाळेतील दुसऱ्या एका सहाय्यक शिक्षकाकडून कारणे दाखवा नोटीसवर कारवाई न करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागितली आहे. Dhule Crime ही लाच त्या सहाय्यक शिक्षक आणि मुख्याध्यापकाच्या अंगलट आली आहे. या लाचखोर सहाय्यक शिक्षक, मुख्याध्यापकाला दिवाळीच्या कालावधीत सरकारी पाहुणचार मिळाला आहे. ही घटना धुळे तालुक्यातील सोनगीर येथे घडली आहे.
Dhule Crime: शिक्षक असून मागत होता शिक्षकाकडेच लाच.. एसीबीचा 'ट्रॅप' झाल्याने मिळला सरकारी पाहुणचार - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
Dhule Crime: मुख्याध्यापकाच्या सांगण्यानुसार एका सहाय्यक शिक्षकाने त्याच शाळेतील दुसऱ्या एका सहाय्यक शिक्षकाकडून कारणे दाखवा नोटीसवर कारवाई न करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागितली. Dhule Crime ही लाच त्या सहाय्यक शिक्षक आणि मुख्याध्यापकाच्या अंगलट आली आहे. या लाचखोर सहाय्यक शिक्षक, मुख्याध्यापकाला दिवाळीच्या कालावधीत सरकारी पाहुणचार मिळाला आहे. ही घटना धुळे तालुक्यातील सोनगीर येथे घडली आहे.
काय आहे प्रकरण या संदर्भात धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं Anti Bribery Department प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार धुळे तालुक्यातील सोनगीर येथील एन जी बागुल हायस्कुलचे मुख्याध्यापक भानुदास हिरामण माळी याने त्याच शाळेतील एका सहाय्यक शिक्षकाला कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यासंदर्भात संबंधित शिक्षकाने मुख्याध्यापकाची भेट घेतली आहे. संबंधित मुख्याध्यापकाने त्याच शाळेतील अन्य एक सहाय्यक शिक्षक हाफिजखान पठाण याला भेटण्यास सांगितले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात रंगेहात अडकलात्यानुसार तक्रारदार शिक्षक पठाणला भेटला असता, पठाण याने तक्रारदार शिक्षकाला देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसीवर कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपये लाचेची मागणी केली आहे. मात्र तडजोडीअंती हाफिजखान पठाण याने मुख्याध्यापक भानुदास हिरामण माळी याच्या सांगण्यानुसार सोनगीर पोलीस स्टेशनसमोर असलेल्या मुंबई- आग्रा महामार्गाजवळ तक्रारदार शिक्षकाकडून लाच स्वीकारतांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात रंगेहात अडकला आहे. या प्रकरणी लाचखोर शिक्षकाविरुद्ध सोनगीर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती.