धुळे - धुळे लोकसभा मतदार संघातील मनमाड-इंदौर रेल्वेमार्गाचा प्रश्न सुभाष भामरे यांनीच मार्गी लावला आहे. या मतदार संघात अजून विकास काम होतील. त्यामुळे डॉ. सुरेश भामरे यांना विजयी करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. भाजप शिवसेना युतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ सुरेश प्रभू हे धुळ्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
विकास कामांसाठी सुभाष भामरेंना विजयी करा - सुरेश प्रभू - सुभाष भामरे
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपकडे विकासाचा मुद्दा आहे. मात्र, त्यासोबतच देशाच्या संरक्षणाचा देखील विषय अत्यंत महत्वाचा असल्याचे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणाले.
या निवडणुकीत देखील भाजपकडे विकासाचा मुद्दा आहे. मात्र, त्यासोबतच देशाच्या संरक्षणाचा देखील विषय अत्यंत महत्वाचा आहे. गेल्या निवडणुकीत धुळे लोकसभा मतदार संघातून सुभाष भामरे विजयी झाले. त्यानंतर त्यांनी धुळे मनमाड-इंदौर रेल्वेमार्गासाठी माझ्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी पाठपुरावा केल्याने या रेल्वेमार्गाचे काम झाले आहे. या मतदार संघात पुढील ५ वर्षात अनेक विकास कामे करायची आहेत. त्यासाठी भामरेंना मते द्या, असे प्रभू म्हणाले. तसेच सुभाष भामरे विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.