धुळे - विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून नंदुरबार जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अभिजीत मोतीलाल पाटील यांनी, तर भाजपकडून माजी मंत्री अमरीश पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. निवडणुकीत आमचाच विजयी होणार असल्याचा दावा महाविकास आघाडी आणि भाजपकडून करण्यात येत आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी येत्या 30 मार्चला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून आपला विजय निश्चित होणार असल्याचा दावा महाविकास आघाडी आणि भाजपकडून करण्यात येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीकडून नंदुरबार जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अभिजीत मोतीलाल पाटील यांनी, तर भाजपकडून माजी मंत्री अमरीश पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी गंगाथरन डी यांच्याकडे सादर केला.