महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ.सुभाष भामरे गोखले यांच्याऐवजी टिळकांचा फोटो ट्विट केल्याने झाले ट्रोल - social media trolling

समाजसुधारक गोपाळ कृष्ण गोखले यांच्या ऐवजी टिळकांचा फोटो ट्विट केल्यामुळे डॉ.सुभाष भामरे ट्रोल झाले. त्यानंतर ते ट्विट डिलीट केले आहे.

SUBHASH BHAMRE
खासदार सुभाष भामरे

By

Published : May 10, 2020, 11:59 AM IST

धुळे-समाजसुधारक गोपाळ कृष्ण गोखले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणारे ट्विट धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले. मात्र, यात त्यांनी गोपाळ कृष्ण गोखले यांच्या ऐवजी लोकमान्य टिळकांचा फोटो वापरल्याने सोशल मीडियावर सुभाष भामरे ट्रोल झाले आहेत.

डॉ.सुभाष भामरेंनी गोखलेऐवजी टिळकांचा फोटो केला ट्विट

समाजसुधारक गोपाळकृष्ण गोखले यांची जयंती 9 मे रोजी साजरी केली जाते, गोपाळ कृष्ण गोखले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सुभाष भामरे यांनी ट्विटरद्वारे अभिवादन केले. मात्र, यात त्यांनी गोपाळ कृष्ण गोखले यांच्या ऐवजी लोकमान्य टिळकांचा फोटो वापरल्याने सुभाष भामरे सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत.

सुभाष भामरे यांच ट्विट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.त्यांनी ते नंतर डिलीट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details