धुळे - भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे हुबेहुब दिसणारे विकास महंते हे सर्वांच्या आकर्षणाचे ठरले. महंते हे हुबेहूब नरेंद्र मोदींसारखे दिसतात. यावेळी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. आपल्याला जनतेचा प्रतिसाद उत्तम मिळत असून स्वतः नरेंद्र मोदी यांची आपण भेट घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
धुळ्यात डॉ. भामरेंच्या रॅलीत सेम टू सेम नरेंद्र मोदी.. सेल्फी घेण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड - narendra modi
सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार विविध प्रकारच्या युक्त्या वापरत असतात.
सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार विविध प्रकारच्या युक्त्या वापरत असतात. धुळे लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी मंगळवारी शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी डॉ भामरेंनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत रॅली काढली. मात्र या रॅलीचे आकर्षण ठरलेत ते विकास महंतें. २०१४ पासून आपण हा गेटअप केला आहे. आपण नरेंद्र मोदी यांचे प्रचंड फॅन असून आपल्या देशाला त्यांच्यासारखा पंतप्रधान लाभला हे आपले भाग्य आहे. मला अनेक ठिकाणी निमंत्रित केले जाते मी त्याठिकाणी जाऊन प्रचार करतो. एकदा प्रत्यक्ष नरेंद्र मोदी यांची देखील आपण भेट घेतली असून त्यांनी देखील माझे कौतुक केल्याचे त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.