धुळे -जिल्ह्यातील निमडाळे येथे विद्यार्थिनीने वसतिगृहामध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रियांका अहिरे, असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती आनंद कनिष्ठ व वरिष्ठ मुलींचे बालगृह याठिकाणी इयत्ता दहावीमध्ये शिकत होती.
धुळ्यात वसतिगृहामध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या, कारण अस्पष्ट - निमडाळे विद्यार्थिनी आत्महत्या
धुळ्यातील निमडाळे गावात वसतिगृहामध्ये एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रियंका अहिरे, असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

मला अभ्यास करायचा आहे. तुम्ही बाहेर जा, असे सांगत प्रियांकाने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ झाल्यामुळे तिच्या मैत्रिणींनी दरवाजा ठोठावला. मात्र, तिने दरवाजा उघडला नाही. शंका आल्याने तेथील महिला अध्यक्ष यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता, प्रियांकाने आत्महत्या केली होती. या आत्महत्येमागील कारण अद्यापही समजू शकले नाही. मात्र, यानिमित्ताने वसतिगृहातील भोंगळ कारभार समोर आला आहे.
दरम्यान, वसतिगृहामध्ये ३० ते ३५ विद्यार्थिनी राहतात. या घटनेमुळे सर्व विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.