महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई - कडक कारवाई

'ब्रेक दि चेन' अंतर्गत शासनाने १४ एप्रिलला राज्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, नागरिक या संचारबंदीत जे नियम लागू आहेत त्याचे पालन करताना दिसत नाहीत. यासोबतच व्यापारीही नियम पाळताना दिसत नाहीत. येथील एका सराफा व्यापाऱ्याने नियमाला डावलून आपले दुकान उघडले. यानंतर त्याला महापालिकेच्या पथकाने दंड आकाराला आहे.

नागरिकांची गर्दी
नागरिकांची गर्दी

By

Published : Apr 19, 2021, 9:38 PM IST

धुळे - 'ब्रेक दि चेन' अंतर्गत शासनाने १४ एप्रिलला राज्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, नागरिक या संचारबंदीत जे नियम लागू आहेत त्याचे पालन करताना दिसत नाहीत. यासोबतच व्यापारीही नियम पाळताना दिसत नाहीत. येथील एका सराफा व्यापाऱ्याने नियमाला डावलून आपले दुकान उघडले. यानंतर त्याला महापालिकेच्या पथकाने दंड आकराला आहे. यासोबतच नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई

सध्या शहरात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने संचारबंदी लागू आहे. अत्यावश्यक सेवेत भाजीपाला, फळ, विक्रेत्यांना मुभा देण्यात आली आहे. मात्र, यामध्येही गर्दी होणार नाही, यासाठी त्यांचे तात्पुरते स्थलांतर केले आहे. परंतु आजही भाजीपाला विक्रेते पाच कंदिल भागात मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस व मनपा पथकाने रस्त्यावर फिरून आढावा घेतला. मात्र, त्याला फारसे यश आले नाही.

व्यावसायिकांना दंड
दुकानदार वर्मा यांचे दुकान उघडे असल्याचे मनपा पथकाला आढळून आले. त्यानंतर त्यांनी दुकानाची पाहणी केली. यावेळी दुकानात ग्राहक असल्याचेही आढळले. त्यानंतर प्रसाद जाधव, संतोष घटी, युवराज खरात, जाकीर भाई, भुषण जगदाळे, दीपक पगारे यांच्या पथकाने या सराफाला ५ हजाराचा दंड आकारला.

ABOUT THE AUTHOR

...view details