महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यात डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनामुळे उडाला गोंधळ; सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा - stop work agitation

धुळ्यातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर आज (शुक्रवार) डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले. या आंदोलनादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले.

stop work agitation of Hire Government Medical College doctors
धुळ्यात डॉक्टरांचे काम बंद आंदोलन

By

Published : May 8, 2020, 4:33 PM IST

धुळे - शहरातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर आज (शुक्रवार) डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले. या आंदोलनादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले. मालेगाव येथील कोरोनाबाधितांवर धुळे येथे उपचार केले जाणार आहेत. अशी माहिती मिळताच हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि नर्स यांनी याचा विरोध करत रुग्णालयाबाहेर कामबंद आंदोलन केले.

हेही वाचा...दारू पिणाऱ्यांना कोरोनाचा धोका अधिक; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा!

मालेगाव येथील कोरोनाग्रस्तांवर मालेगावमध्येच उपचार करण्यात यावेत, अशी मागणी या डॉक्टर आणि नर्स यांनी केली आहे. मालेगावमधील कोरोनाग्रस्त रुग्णांमुळे धुळ्यातही कोरोनाचा फैलाव वाढेल, असे म्हणत या डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. महत्वाचे म्हणजे सर्वासामान्यांना शिकवण देणाऱ्या या डॉक्टरांच्या आंदोलनादरम्यान मात्र, सोशल डिस्टन्सिंगन पूर्णतः फज्जा उडाल्याचे दिसून आले.

ABOUT THE AUTHOR

...view details