धुळे - पाचकंदील भागात शंकर मार्केटला भीषण आग लागली होती. त्यावेळी तिथे उपस्थित महापालिका धुळेचे अग्निशमन सहाय्यक अधिकारी तुषार ढाके यांच्याकडे फक्त 2 अग्निशमन बंब होते. मात्र त्यांच्याबरोबर प्रशिक्षित कर्मचारी नव्हते. तेव्हा फक्त एकच दुकानाला आग लागलेली होती. घटनेचं गांभीर्य पाहत नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी अतिरिक्त अग्निशमन बंब पाठवण्यास सांगितले. मात्र, बंब सहा महिन्यांपासून नादुरुस्त असल्याचे उत्तर टोल प्रशासनाने दिले होते. सोनागीर टोल नाक्याचे अधिकारी यांनीही अग्निशमन बंब नादुरुस्त असून पाठवण्यास असमर्थता दर्शविली होती.
'अग्निशामक बंब दुरुस्त होत नाही, तोपर्यंत टोल वसुली थांबवा'
पाचकंदील भागात शंकर मार्केटला भीषण आग लागली होती. त्यावेळी तिथे उपस्थित महापालिका धुळेचे अग्निशमन सहाय्यक अधिकारी तुषार ढाके यांच्याकडे फक्त 2 अग्निशमन बंब होते. मात्र त्यांच्याबरोबर प्रशिक्षित कर्मचारी नव्हते. तेव्हा फक्त एकच दुकानाला आग लागलेली होती. घटनेचं गांभीर्य पाहत नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी अतिरिक्त अग्निशमन बंब पाठवण्यास सांगितले. मात्र, बंब सहा महिन्यांपासून नादुरुस्त असल्याचे उत्तर टोल प्रशासनाने दिले होते. सोनागीर टोल नाक्याचे अधिकारी यांनीही अग्निशमन बंब नादुरुस्त असून पाठवण्यास असमर्थता दर्शविली होती.
केवळ अग्निशमन दलाचे बंब नसल्याने ही आग वाढली. त्यामुळे २७ दुकाने जळून खाक झाली. या प्रकरणाची चौकशी करून ज्यांची दुकाने आणि त्यातील सामान पूर्णपणे जळून खाक झालंय, त्यांना प्रशासनाने मदत करावी, अशी मागणी नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी केली आहे. शिवाय जो पर्यंत सर्व व्यावसायिकांना त्यांची नुकसानभरपाई मिळत नाही आणि संपूर्ण अग्निशामक बंब दुरुस्त करत नाही तोपर्यंत टोल वसुली थांबली पाहिजे, अशी मागणी नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.