धुळे- कोरेगाव भीमा प्रकरणी राज्य सरकार योग्य ती चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करेल. फोन टॅपिंग ही अत्यंत चुकीची गोष्ट असून याबाबत मुख्यमंत्री लवकरच योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास ग्रामविकास आणि महसूल राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी धुळ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
ग्रामविकास आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत धुळे जिल्ह्यातील विविध विभागांचा अब्दुल सत्तार यांनी सखोल आढावा घेतला. या बैठकीनंतर अब्दुल सत्तार यांनी पत्रकारांशी वार्तालाप साधला. त्यावेळी ते बोलत होते.