धुळे- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज धुळ्यात लक्ष वेध आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे या प्रमुख मांगणी सोबतच ईतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने धुळ्यात 'लक्षवेध' आंदोलन - २० जुलै रोजी १ दिवसाचा राज्यव्यापी लाक्षणिक संप
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज धुळ्यात लक्ष वेध आंदोलन करण्यात आले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करणे या प्रमुख मांगणी सोबतच ईतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वात जुनी पेन्शन योजना लागू करणे, सहाव्या वेतन आयोगातील त्रुटींचा विचार करणारा बक्षी समितीचा अहवाल प्रस्तुत करणे, केंद्राप्रमाणे वाहतूक, शैक्षणिक, होस्टेल आणि शहर भत्ता लागू करणे, केंद्राप्रमाणे सर्व अनुदेय भत्ते लागू करणे, महिला कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजा लागू करणे, सर्व संवर्गातील रिक्त पदे त्वरित भरणे, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी प्राप्त झालेले सर्व अर्ज निकाली काढणे, ५ दिवसाचा आठवडा आणि निवृत्तीचे वय ६० करणे, व जानेवारी २०१९ च्या महागाई भत्ता फरकाच्या रकमेसह मंजूर करणे, यासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने भोजन काळात निदर्शने करून आंदोलन करण्यात आले.
शासनाने या मागण्यांकडे लक्ष देऊन त्यांना त्वरित मंजूर करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागण्या मान्य न केल्यास २० जुलै रोजी १ दिवसाचा राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारण्यात येईल. असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.