धुळे -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला धुळे जिल्ह्यात शांततेत सुरुवात झाली.जिल्ह्यात एकूण 63 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होत आहे. यात 31 हजार 837 विद्यार्थी परीक्षा देत आहे.
इयत्ता दहावीच्या परीक्षेला धुळे जिल्ह्यात शांततेत सुरुवात... हेही वाचा...दहावीच्या परीक्षांसाठी दिंडोरी तालुक्यातील केंद्र सज्ज, पाच हजार विद्यार्थी देणार परीक्षा
परिक्षेच्या दृष्टीने सर्व परीक्षा केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण जिल्ह्यात भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून (मंगळवार) सुरुवात झाली. धुळे जिल्ह्यात या परीक्षेसाठी 31 हजार 837 विद्यार्थी प्रविष्ट असून 63 परीक्षा केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा...परीक्षा दहावीची : 'तर... केंद्र संचालकासह पर्यवेक्षकावर गुन्हे दाखल होणार'
दिनांक 3 मार्च ते 23 मार्च या कालावधीत ही परीक्षा होणार असून एकाच केंद्रावर पाचपेक्षा अधिक कॉपीबहाद्दर आढळले तर थेट पर्यवेक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही पर्यवेक्षकीय यंत्रणेत बदल करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात सहा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता, उपशिक्षणाधिकारी यांचे भरारी पथक राहणार आहे.