Soybean Theft Case : धुळे 'एमआयडीसी'तील कंपनीतून सोयाबीनची चोरी; सहा जणांना अटक - सोयाबीन चोरी प्रकरण धुळे
धुळे शहराजवळील अवधान 'एमआयडीसी' मधून तब्बल 63 हजारांचे सोयाबीन चोरून नेणाऱ्या सहा चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटकेतील आरोपी
By
Published : May 9, 2023, 6:01 PM IST
सोयाबीन चोरी प्रकरणाविषयी माहिती देताना पोलीस अधिकारी
धुळे: प्राप्त माहितीनुसार, ७ मे रोजी फिर्यादी रवींद्र विलास येडे (जयदुर्गा इंडस्ट्रीज, एम.आय.डी.सी अवधान, धुळे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मोहाडी नगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यात फिर्यादी यांच्या मालकीच्या सोयाबीनचे (किंमत- ६३,२५० रुपये) २३ कट्टे चोरांनी चोरून नेले होते.
या पोलिसांनी दाखविली तत्परता: या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस. ऋषिकेश रेड्डी, यांच्या सूचनाप्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी मोहाडी नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि भूषण कोते, सपोनि प्रकाश पाटील करीत होते. याकरिता असई अशोक पायमोडे, पो.ना. राहुल पाटील, जितेंद्र वाघ, मुकेश मोरे, बापूजी पाटील, जयकुमार चौधरी या पोलिसांचे तपास पथक तयार करण्यात आले होते.
आरोपींकडून चोरीची कबूली: या पथकाकडून गुन्ह्यातील आरोपींचा व चोरून नेलेल्या मालाबाबत गुन्ह्याचा तपास सुरू असताना तांत्रिक पुराव्याच्या विश्लेषणाच्या आधारे काही जणांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये रवी यशवंत मालचे (रा. दिवानमळा, ता.जि. धुळे), करण शांताराम सोनवणे (रा. दिवानमळा), नवनाथ महादू सोनवणे (रा. दिवानमळा), सोमनाथ राजू सोनवणे (रा. लळिंग, ता. जि. धुळे), आकाश सुकदेव ठाकरे (रा. लळिंग) आणि दगा रामदास पवार (रा. जुन्नेर ता. जि. धुळे) यांचा समावेश होता. यांची विचारपूस केली असता त्यांनी ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून दाखल गुन्ह्यातील चोरी गेलेला सोयाबीन माल आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण १ लाख ३१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यांनी बजावली कामगिरी:ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस ऋषिकेश रेड्डी, यांचे मार्गदर्शनाखाली मोहाडी नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि भूषण कोते, सपोनि प्रकाश पाटील, यांचे नेतृत्वात असई अशोक पायमोडे, पोना राहुल पाटील, पो.कॉ. जितेंद्र वाघ, मुकेश मोरे, बापूजी पाटील, जयकुमार चौधरी, मयूर गुरव यांनी केली आहे.