महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अनैतिक संबंधाच्या संशयातून मुलाने केला पित्याचा खून - dhule murder case

पत्नी आणि वडिलांचे अनैतिक संबध असल्याच्या संशयावरून पोटच्या मुलाने बापाचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील फत्तेपूर येथे घडली आहे. याबाबत संशयित आरोपीच्या आईने शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे तक्रार दिली.

murdere
अनैतिक संबंधाच्या संशयातून मुलाने केला पित्याचा खून

By

Published : May 22, 2020, 6:29 PM IST

धुळे - पत्नी आणि वडिलांचे अनैतिक संबध असल्याच्या संशयावरून पोटच्या मुलाने बापाचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील फत्तेपूर येथे घडली आहे. याबाबत संशयित आरोपीच्या आईने शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे तक्रार दिली.

घटनाक्रम -

२१ मे रोजी रात्री ९ वाजता मुलगा जो संशयित आरोपी आहे, त्याने कोंबडी कापून भाजी बनविण्यासाठी सांगितले. यासाठी तक्रारदार आई गावात तेल खरेदीसाठी गेली होती. मुलगा आणि सून आपल्या मुलांसह घरीच होते. तेव्हा रस्त्यात तक्रारदार महिलेला त्यांचे पती भेटले. तेव्हा कोंबडीच्या भाजीसाठी तेल आणण्यासाठी चालले असल्याचे त्यांना सांगितले. त्या तेल घेऊन पुन्हा घरी पोहोचल्या असता, घरासमोर पती मृतावस्थेत पडले होते. त्यांच्या गळ्यास दुखापत होवून रक्तबंबाळ झाले होते.

मुलाच्या हातात रक्त लागलेली कुऱ्हाड होती. तेव्हा आईने मुलास विचारले, की तु तुझ्या वडिलांना का मारले? असे विचारले असता, त्याने आईलाही मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने पत्नीला देखील मारून टाकेल, अशी धमकी दिली. शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे बिनज्या पावरा याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details