धुळे- केंद्रीय अर्थसंकल्पात शासनाने लघु उद्योग, कुटीर उद्योग यांना चालना द्यावी. तसेच बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा धुळ्यातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
'अर्थसंकल्पात लघु उद्योग आणि कुटीर उद्योगांना चालना द्यावी'
केंद्रीय अर्थसंकल्पात शासनाने लघु उद्योग, कुटीर उद्योग यांना चालना द्यावी, अशी अपेक्षा धुळ्यातील व्यापाऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात देशाच्या दृष्टीने विविध योजना राबवण्यात येणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. तसेच या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी, उद्योजकांसाठी देखील विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत.
या अर्थसंकल्पाबाबत धुळे शहरातील व्यापाऱ्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणे गरजेचे आहे. देशातील लघु उद्योग, कुटीर उद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच बेरोजगारी कमी करण्यासाठी विशेष पावले उचलावीत, अशी प्रतिक्रिया यावेळी व्यापाऱ्यांनी दिली.