धुळे- शहरातील पांझरा नदी किनारी असलेले श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गेल्या दीडशे वर्षांपूर्वी हे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधले असल्याचे सांगितले जात आहे. श्रावण महिन्यानिमित्त या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दुसरा श्रावण सोमवार; भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या धुळ्यातील सिद्धेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मांदियाळी
धुळ्यातील पांझरा नदीकाठी असलेले श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर हे गेल्या १५० वर्षांपूर्वी अहिल्याबाई होळकरांनी बांधल्याचे सांगितले जात आहे. या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असतात. श्रावण महिन्यात या मंदिरात भजन, कीर्तन, अभिषेक असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
निसर्गाच्या हिरवाईने नटलेला आणि भक्तीचा महासागर असलेला श्रावण महिना सगळ्यांना हवाहवासा वाटतो. श्रावण महिन्यात भगवान शंकराची आराधना केली जाते. आजच्या दुसऱ्या श्रावण सोमवारी आपण पाहणार आहोत, धुळ्यातील अतिशय प्राचीन असलेल्या पांझरा नदीकाठावरील सिद्धेश्वर महादेव मंदिर...
धुळ्यातील पांझरा नदीकाठी असलेले श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर हे गेल्या १५० वर्षांपूर्वी अहिल्याबाई होळकरांनी बांधल्याचे सांगितले जात आहे. या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असतात. श्रावण महिन्यात या मंदिरात भजन, कीर्तन, अभिषेक असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. धुळे शहर आणि जिल्ह्यातील भाविक या मंदिरात दर्शनाला येत असतात. या मंदिरात संगमरवरी शिवलिंग असून गणपती मंदिर देखील आहे. असे हे श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे.