महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हाध्यक्षास मारहाण : महापौरांच्या पुत्रावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचा मोर्चा - chnadrkant soanr

महापौर पुत्रांवर कारवाई करा, शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.. देवा सोनार यांच्यावर कारवाई न झाल्यास शिवसेना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

धुळे मारहाण प्रकरणी शिवसेनाचा मोर्चा

By

Published : May 9, 2019, 5:20 PM IST

Updated : May 9, 2019, 5:36 PM IST

धुळे- शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांना महापौराच्या मुलाने मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली होती. त्या प्रकरणी महापौर चंद्रकांत सोनार यांच्या मुलावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरात गुंडगिरीला आळा घालावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शिवसेना जिल्हाध्यक्षास मारहाण प्रकरणी मोर्चा


धुळे जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांना गेल्या २ दिवसांपूर्वी महापौर चंद्रकांत सोनार यांचा मुलगा नगरसेवक देवा सोनार याने बेदम मारहाण केली. यात हिलाल माळी यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे शिवसैनिक प्रचंड संतप्त झाले आहेत. त्यामुळे त्यांनी माळी यांना झालेल्या मारहाणीप्रकरणी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी त्यांनी शहरात गुंडगिरीचे प्रमाण वाढत असून याला आळा घालण्यात यावा. तसेच हिलाल माळी यांना मारहाण करणाऱ्या महापौरांच्या मुलावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

या मोर्चात धुळे शहरासह ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी विजय गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले. देवा सोनार यांच्यावर कारवाई न झाल्यास शिवसेना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

Last Updated : May 9, 2019, 5:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details