धुळे - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात धुळे शहरात आंदोलन सुरू असताना आंदोलकांकडून पोलिसांवर हल्ला करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच आंदोलनकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलकांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचा सेनेकडून निषेध, कठोर कारवाईची मागणी - धुळे शिवसेना आंदोलन
बहुजन क्रांती मोर्चाच्या भारत बंद दरम्यान धुळ्यामध्ये आंदोलकांनी पोलिसांनी हल्ला केला होता. या घटनेच्या निषेधार्थ आज (गुरुवारी) शिवसेनेकडून निदर्शने करण्यात आली.
बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंददरम्यान बुधवारी धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील शंभर फुटी रोड या भागात आंदोलन कर्त्यांनी दगडफेक केली. तसेच पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करून जाळपोळ केली होती. आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर हल्ला देखील करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून आंदोलनकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.