महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे: जलशुद्धीकरण केंद्राचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर - शिवसैनिक धुळे

साक्री शहरातील नागरिकांना गेल्या महिन्या भरापासून गढूळ पाणी पुरवठा केला जात आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतून प्रक्रियेविना थेट नळांना पाणी सोडले जात आहे. यामुळे शहरातील रहिवाशांना साथीच्या आजारांनी ग्रासले आहे.

जलशुद्धीकरण केंद्राचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

By

Published : Aug 28, 2019, 10:01 PM IST

धुळे -साक्री नगरपंचायत जलशुद्धीकरण केंद्र अनेक दिवसांपासून बंद आहे. शहरातील नागरिकांना गेल्या महिन्या भरापासून गढूळ पाणी पुरवठा केला जात आहे. या विरोधात साक्री शहर शिवसेनेच्यावतीने मुदत संपलेली अँलम, टीसीएल पावडर आणि गढूळ पाण्याच्या बाटल्यांची शहरातून मिरवणूक काढत मुख्यधिकाऱ्यांना भेट देण्यात आले.

जलशुद्धीकरण केंद्राचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

साक्री शहरातील नागरिकांना गेल्या महिन्या भरापासून गढूळ पाणी पुरवठा केला जात आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीतुन प्रक्रियेविना थेट नळांना पाणी सोडले जात आहे. यामुळे शहरातील रहिवाशांना साथीच्या आजारांनी ग्रासले आहे. तर पाण्यात टाकण्यासाठी मुदत संपलेली टीसीएल पावडर आणि अँलम यांचा वापर केला जात आहे. अनेक दिवसांपासून बंद असलेले जलशुद्धीकरण केंद्राचे शुध्दीकरणाचे काम केलेले नाही. मंगळवारी शहर शिवसेनेचे विधानसभा संघटक पंकज मराठे यांनी पत्रकारांसह शहरातील जलशुद्धीकरण केंद्रात अचानक पाहणी केली. यामुळे नगरपंचायत प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. याप्रसंगी नगरपंचायतचे अधिकारी सुनील चौधरींसह कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे शिवसैनिक अधिकच संतापले.

जलशुद्धीकरण केंद्रावर स्वतंत्र कर्मचारी नाही. याठिकाणी मुदत संपलेली टीसीएल आणि अँलम आढळून आले. तर पाण्याच्या टाक्ंयाची साफसफाई केलेली नसल्याने शिवसेनेचे विधानसभा संघटक पंकज मराठे यांनी चौधरींना चांगलेच धारेवर धरले. 2013 साली घेतलेली टीसीएल पावडर आजही वापरली जात आहे. तर 2018 साली साक्री येथील एका जनरल स्टोअर्स वरून टीसीएल पावडर विकत घेतल्याच्या पावत्या दाखवण्यात आल्या . मात्र, जलशुद्धीकरण केंद्रात एकही नवीन पावडरची गोणी आढळून आली नाही. पावडर वापरण्यात आल्याचे तोंडी सांगितले जाते. मात्र, रजिस्टरवर याची स्वतंत्र नोंद करण्यात येत नाही. यामुळे नगरपंचायत प्रशासनाने चालवलेल्या भोंगळ कारभार साक्री शहर शिवसेनेने चव्हाट्यावर आणला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details