महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा फटका शिवभोजन थाळीलाही, ग्राहकांची संख्या रोडावली

कोरोनाचा वाढता प्रसार पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांनी घराबाहेर जाणे तसेच सार्वजनिक ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे, लोकांनी शिवभोजनाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले आहे. शहरातील शिव भोजन केंद्रांवर ग्राहकांची संख्या घटल्याचे दिसून आले आहे. यामुळे शिव भोजन केंद्र संचालक चिंतातूर झाले आहेत.

shivbhojan centre dhule
शिवभोजन केंद्र

By

Published : Mar 16, 2020, 9:13 PM IST

धुळे- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेस सार्वजनिक ठिकाणी जाण्यापासून मज्जाव केला आहे. याचा फटका ठाकरे सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी या महत्त्वाकांक्षी योजनेला बसताना दिसत आहे. शहरातील शिवभोजन थाळी केंद्रावर ग्राहकांची संख्या घटली आहे.

प्रतिक्रिया देताना शिवभोजन केंद्र चालक

शिव भोजन थाळी केंद्र चालकांना सकाळी ११ वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्व शिव भोजन केंद्र सुरू ठेवावी लागतात. या दरम्यान त्यांना थाळींचे दिलेले टार्गेट पूर्ण करावे लागते. स्वस्तात चांगले जेवण मिळत असल्याने शहरातील लोक या थाळीचे आस्वाद घ्यायचे. त्यामुळे, १५० भोजन थाळी विक्रीचे ठरलेले टारगेट हे वेळेत पूर्ण व्हायचे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रसार पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांनी घराबाहेर जाणे तसेच सार्वजनिक ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे, लोकांनी शिवभोजनाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले आहे. शिव भोजन केंद्रांवर ग्राहकांची संख्या घटली असून शिव भोजन केंद्र चालक चिंतातूर झाले आहेत.

हेही वाचा-धुळ्यात लाचखोर वनक्षेत्रपाल एसीबीच्या जाळ्यात; 25 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

ABOUT THE AUTHOR

...view details