धुळे -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध ठिकाणी शक्ती प्रदर्शन रॅलीचे सुरु आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे समर्थक देखील कार्यकर्ते शक्ती प्रदर्शन करत आहेत. धुळ्यात शिवसेनेचे महानगर प्रमुख असलेले सतीश महाले यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयास त्यांनी आपला पाठिंबा दर्शवत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तशा आशयाचा पत्र सतीश महालेंनी पक्ष प्रमुखांना लिहिले आहे.
Dhule Shivsena : एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ शिवसेनेच्या सतीश महालेंनी दिला महानगर प्रमुख पदाचा राजीनामा - एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ महानगर पदाचा राजीनामा
धुळ्यात शिवसेनेचे महानगर प्रमुख असलेले सतीश महाले यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयास त्यांनी आपला पाठिंबा दर्शवत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तशा आशयाचा पत्र सतीश महालेंनी पक्ष प्रमुखांना लिहिले आहे.
सध्याच्या राज्यातील चालेल्या राजकीय घडामोडींना अनुसरून नमूद करू इच्छितो की, मागील काळात वेळोवेळी मला आलेल्या राजकीय, सामाजिक अडचणींमध्ये, संकटसमयी एकनाथ शिंदे हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. तेव्हापासून मी सतत त्यांच्या संपर्कात होतो आहे. म्हणून सद्य परिस्थितीत एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयास पाठिंबा देऊन मी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला असल्याने मी महानगर प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. तो आपण स्वीकार करावा, असे सतीश महाले यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.
हेही वाचा -VIDEO : कोल्हापुरात राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांचे शक्ती प्रदर्शन