धुळे : कर्नाटक राज्याच्या बेळगाव जिल्ह्यातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा कर्नाटक सरकारने रातोरात हटवला. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्या धुळे महानगर शाखेच्या वतीने कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले, यावेळी कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला.
धुळ्यात शिवसैनिकांकडून कर्नाटक सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन - shivaji maharaj statue belgaum karnataka news
बेळगावातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरून वातावरण तापले आहे. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्या धुळे महानगर शाखेच्यावतीने कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले, यावेळी कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला.

बेळगाव जिल्ह्यातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मणगुत्ती ग्रामपंचायतीच्या ठरावानं छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा अश्वारुढ पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, अचानक बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हा पुतळा हटवल्याने या भागात तणाव निर्माण झाला. तर दुसरीकडे, महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद जागोजागी उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज शिवसेनेच्या धुळे महानगर शाखेच्यावतीने धुळे महापालिकेसमोर कर्नाटक सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज गोरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
TAGGED:
धुळे महानगर शाखा बातमी