महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shinde Group Prepares For Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी शिंदे समर्थकांकडून धुळ्यातून १५१ एसटी बसेस बुक; तर ठाकरे समर्थक रेल्वे, खासगी वाहनांनी मुंबईला जाणार - Booking 151 Buses From Dhule

दसरा मेळावा अवघ्या काही तासांवर आल्याने ( Dasara Melava of Both Groups of Shiv Sena ) मेळाव्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली ( Two Factions of Shiv Sena are Holding Dasara Melava ) आहे. कारण एकाच ( CM Eknath Shinde will Address on BK Ground ) दिवशी दोन दसरा मेळावे मुंबईत भरणार आहेत. शिवसेनेच्या इतिहासातील ( Uddhav Thackeray will Address at Shivaji Park ) अत्यंत हायव्होल्टेज दसरा मेळावा असणार आहे. कारण दोन्ही गटांची प्रतिष्ठा यानिमित्ताने पणाला लागली आहे. धुळ्यातून शिंदे समर्थकांनी एसटी महामंडळाच्या १५१ एसटी बसेस बुक केल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली आहे. तर उद्धव ठाकरे गट समर्थक रेल्वे, तथा खासगी वाहनांनी जाणार आहे.

Shinde Group Prepares For Dasara Melava
दसरा मेळाव्यासाठी शिंदे समर्थकांकडून धुळ्यातून १५१ एसटी बसेस बुक

By

Published : Oct 4, 2022, 10:56 AM IST

धुळे : शिवसेनेच्या दोन्ही गटांचा दसरा मेळावा अवघ्या काही तासांवर ( Dasara Melava of Both Groups of Shiv Sena ) आला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर यंदा प्रथमच शिवसेनेच्या दोन गटांचा मुंबईत दोन ठिकाणी दसरा मेळावा ( Two Factions of Shiv Sena are Holding Dasara Melava ) होत आहे. कोणाच्या दसरा मेळाव्याला गर्दी ( CM Eknath Shinde will Address on BK Ground ) अधिक, कोण काय बोलणार? याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले आहे. धुळ्यातून शिंदे समर्थकांनी एसटी महामंडळाच्या १५१ एसटी बसेस बुक केल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली आहे. तर उद्धव ठाकरे समर्थक रेल्वे, खासगी वाहनाने मेळाव्याला जाणार ( Uddhav Thackeray will Address at Shivaji Park ) आहेत.

दसरा मेळाव्यासाठी शिंदे समर्थकांकडून धुळ्यातून १५१ एसटी बसेस बुक

शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे समर्थकांची शहरात होणार गर्दी : शिंदे समर्थकांनी शक्यतो शिवशाही एसटी बसेससाठी आग्रह केला असल्याचेदेखील सांगण्यात आले आहे. याशिवाय उद्धव गटाचे समर्थक खासगी वाहनांनीदेखील मुंबईकडे रवाना होत आहे. शिंदे गटाच्या एका समर्थकाने दिलेल्या माहितीनुसार साधारणतः १५ ते २० हजार कार्यकर्ते धुळे जिल्ह्यातून रवाना होत आहे. दोन्ही गटांची प्रतिष्ठा यानिमित्ताने पणाला लागली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर यंदा प्रथमच शिवसेनेच्या इतिहासात दोन गटांचा मुंबईत दोन ठिकाणी दसरा मेळावा होत आहे. कोणाच्या दसरा मेळाव्याला गर्दी अधिक, कोण काय बोलणार? याकडे महाराष्ट्रातील तमाम जनतेचे लक्ष लागलेले आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिंदे समर्थकांकडून धुळ्यातून १५१ एसटी बसेस बुक

शिवसेनेच्या इतिहासातील सगळ्यात महत्त्वाचा दसरा मेळावा; एकाच दिवशी दोन मेळावे :उद्धव ठाकरे समर्थकदेखील रेल्वे आणि खासगी वाहनाने मुंबईला रवाना होत आहे. साधारणत: १० ते १५ हजार कार्यकर्ते मुंबईला रवाना होत असल्याचे ठाकरे समर्थकाने सांगितले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे, निर्बंधामुळे दोन वर्षांनंतर होणाऱ्या या दसऱ्या मेळाव्याचे यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे मुंबईत एकाच दिवशी दोन ठिकाणी शिवसेनेच्या दोन गटांचा दसरा मेळावा होत आहे. कोणाच्या दसरा मेळाव्याला गर्दी अधिक, कोण काय बोलणार? याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिंदे समर्थकांकडून 151 बसेस बुक

कोणत्या आगारातून किती एसटी बसेस : एसटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटीच्या धुळे विभागातून १५१ एसटी बसेस बुक करण्यात आल्या आहेत. यात धुळे आगार -१८, शिंदखेडा आगारातून ११, शिरपूर आगारातून १०, दोंडाईचा आगारातून १५, साक्री आगारातून २०, शहादा आगारातून २७, अक्कलकुवा आगारातून १०, नवापूर आगारातून १५, नंदुरबार आगारातून ४० असे एकूण १५२ एसटी बसेस बुक करण्यात आल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात एसटी बसेस मुंबईला रवाना होत असल्याने ग्रामीण भागातील फेऱ्यांवर याचा साहजिकच परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. शिंदे सरकार दसरा मेळाव्यानिमित्त कार्यकर्त्यांचे मन राखतात की जनतेचे मन राखतात, असा प्रश्न मात्र प्रवासी वर्गातून उपस्थित होत आहे.

पर्यायी व्यवस्था काय : १५१ बसेस मुंबईला गेल्यावर ग्रामीण भागातील फेऱ्यांवर परिणाम होणार नाही. कोणत्याही फेऱ्या रद्द होणार नाही. नवरात्रीनिमित्त एसटी बसने प्रवास करणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, याबाबत काय उपाययोजना, पर्यायी व्यवस्था करण्यात आली. याबाबत मात्र एसटीच्या स्थानिक आणि वरिष्ठ कार्यालयाकडून सायंकाळी उशिरापर्यंत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details