महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Diwali Ration : शिंदे सरकारचे ढिसाळ नियोजन; दिवाळीनंतर शिधा मिळाला, तोही साखरेविना! - Diwali ration was given without suga

शिंदे सरकारने ( Shinde group ) यंदाच्या दिवाळीत स्वस्त धान्य दुकानातून शिधा पत्रिका धारकांना ( Ration card holders ) शंभर रुपयात एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणा डाळ, एक किलो तेल या चार वस्तू मिळतील अशी घोषणा केली. मात्र दिवाळी संपल्यानंतर धुळे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये हा शिधा पोहोचला तो देखील साखरेविना. ( Diwali ration was given without sugar )

Diwali Ration
Diwali Ration

By

Published : Oct 31, 2022, 10:50 AM IST

धुळे : शिंदे सरकारने ( Shinde group ) यंदाच्या दिवाळीत स्वस्त धान्य दुकानातून शिधा पत्रिका धारकांना ( Ration card holders ) शंभर रुपयात एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणा डाळ, एक किलो तेल या चार वस्तू मिळतील अशी घोषणा केली. साधारण १० ते १५ वर्षानंतर केशरी शिधा पत्रिका धारकांना दिवाळीत साखर, तेल, रवा, चणा डाळ या चार वस्तू मिळत असल्याने शिधा पत्रिका धारकांमध्ये विशेषतः केशरी शिधा पत्रिका धारकांमध्ये या विषयी उत्सुकता, कुतूहल होते. मात्र दिवाळी संपल्यानंतर धुळे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये हा शिधा पोहोचला. तो देखील साखरेविना, ( Diwali ration was given without sugar ) त्यामुळे हा शिधा घेतांना ग्राहकांच्या चेहऱ्यावर ना पूर्ण आनंद दिसला, ना गोडवा.

Diwali Ration
सरकारची योजना चांगलीच मात्र नियोजनाचा अभाव : दिवाळीपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक रेशन दुकानातून शिंदे सरकारची महत्वाकांक्षी आनंदाचा शिधा ही योजना प्रभावी अंमलबजावणी होऊन शिधा पत्रिका धारकांना याचा लाभ मिळेल हा झाला सरकारचा उद्देश, मात्र सरकारी यंत्रणा, ढिसाळ नियोजन यामुळे दिवाळी नंतर धुळे जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून आनंदाचा शिधा वाटपास, वितरणास सुरुवात झाली. मात्र सरकारने जाहीर केल्यानुसार शंभर रुपयात साखर, तेल, रवा, चणा डाळ या चार वस्तू मिळतील या अपेक्षेने रेशन दुकानांबाहेर शिधा पत्रिका धारकांनी रांग लावली मात्र या चार वस्तूंमध्ये साखर नसल्याचे समजताच शिधापत्रिका धारकांनी नाराजी व्यक्त केली. काहींनी या योजनेचं स्वागत केलं तर काहींनी यातील उणिवा, नियोजनाचा अभाव यावर बोट ठेवले. रेशन दुकानांमधून आनंदाचा शिधा या रेशन किटच वाटप ऑफ लाईन पद्धतीने होतं आहे. या किटमध्ये साखर नसल्याने ही साखरनंतर शिधापत्रिका धारकांना मोफत देण्यात येणार आहे. आताच किटचे शंभर रुपये घेतल्याने त्यात ही चार वस्तूं ऐवजी तीनच वस्तू वितरित होत आहे. त्यामुळे या किट मधील साखर नंतर फ्री देतांना रेशन दुकानदारांची तसेच सरकारी यंत्रणेची कसोटी की ट्वेंटी ट्वेंटी होणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.



८ शासकीयगोदाम, ९८८ स्वस्त धान्य दुकानातून सुरु झालंय वितरण : धुळे जिल्ह्यात अंत्योदय योजनेंतर्गत ७४ हजार ७३६ तर प्राधान्य कुटुंब अंतर्गतअर्थात केशरी कार्ड धारक २ लाख २४ हजार १८० इतके लाभार्थी आहेत. असे हे दोन्ही प्रकारचे लाभार्थी मिळून एकूण २ लाख ९८ हजार ९१६ लाभार्थी आहेत. यानुसार धुळे जिल्ह्यात २ लाख ९८ हजार ९१६ दिवाळी रेशन किटचे वितरण करण्याची लगभग सध्या सरकारी पातळीवर सुरु झाली आहे. धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, साक्री, पिंपळनेर, नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा, होळनांथे या आठ शासकीय गोदामातून जिल्ह्यातील ९८८ स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून हे वितरण सध्या सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानुसार प्रत्येक स्वस्त धान्य (रेशन ) दुकानातून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थींना अवघ्या शंभर रुपयात एक किलो हरबरा चणा डाळ, एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो पामतेल या चार वस्तू मिळणार आहे.


केवळ धुळे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांसाठीच ही मुभा : शिंदे सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी तत्परतेने करण्यासाठी, तसेच लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून धुळे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकान चालकांनी या दिवाळी किट अगोदर उपलब्ध करून त्यांचे लाभार्थींना तात्काळ वितरण करावे, त्या नंतर या किट साठीचा सरकारी भरणा करावा अशी मुभा स्थानिक पातळीवर देण्यात आली आहे, जेणेकरून वितरणाला अडचणी येऊ नयेत, लाभार्थ्यांना देखील तत्परतेनं हे किट उपलब्ध व्हावे, हा त्यामागचा उद्देश असल्याचे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी मुकेश कांबळे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details