धुळे - शहरातील सहजीवन नगर भागातून एका अल्पवयीन मुलाकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. या कारवाईत पथकाने 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या मुलाची झडती घेतली असता त्याच्याकडून देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस पथकाला मिळून आली आहेत.
धुळे पोलिसांची कारवाई; अल्पवयीन मुलाकडून धारदार शस्त्र जप्त
धुळे शहरातील सहजीवन नगर भागात एक व्यक्ती गावठी कट्टा घेऊन मोटरसायकलवरून फिरत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीनुसार पथकाने या व्यक्तीला दसेरा मैदान या भागात पकडले.
धुळे शहरातील सहजीवन नगर भागात एक व्यक्ती गावठी कट्टा घेऊन मोटरसायकलवरून फिरत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीनुसार पथकाने या व्यक्तीला दसेरा मैदान या भागात पकडले असता, तो अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. अल्पवयीन मुलाची झडती घेतली असता त्याच्याकडे 15 हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल, पाचशे रुपये किमतीचे दोन जिवंत काडतूस, 1 हजार रुपये किमतीची 13 फूट लांबीचे पितळी मूठ असलेली तलवार, पाचशे रुपये किमतीची एक लोखंडी लाकडी मूठ असलेला कोयता, आणि 20 हजार रुपये किंमतीची करड्या रंगाची बिना नंबर प्लेट असलेली सुझुकी कंपनीची दुचाकी असा एकूण 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अशाप्रकारे गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांचे राज्य खपवून घेतल जाणार नाही कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी यावेळी दिली. अल्पवयीन मुलाने हा मुद्देमाल कुठून आणला आहे तसेच इतर कुठल्या संघटनांशी याचा संबंध आहे का? याचादेखील तपास केला जाणार आहे.