धुळे -संपूर्ण देशाची सत्ता एकाच हातात केंद्रित करण्याची भूमिका घेतली जात असून, आमच्या हातात सत्ता आम्ही सांगू ती पूर्व दिशा, अशी टोकाची भूमिका घेत सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांनी केला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सारखे ( Governor Bhagat Singh Koshyari ) व्यक्ती जर अशी वागत असतील तर लोकांनी लोकशाहीवर ( Democracy ) विश्वास ठेवायचा कसा हा मोठा प्रश्न आहे. धुळ्यातील राष्ट्रवादी भुवनच्या उदघाटन प्रसंगी ते धुळ्यात बोलत होते.
Sharad Pawar On Governor Koshyari : राज्यपाल असे वागत असेल तर लोकांनी लोकशाहीवर कसा विश्वास ठेवायचा - शरद पवार - Democracy
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) सारखे व्यक्ती जर, अशी वागत असतील तर लोकांनी लोकशाहीवर विश्वास ठेवायचा कसा हा मोठा प्रश्न आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांनी म्हटले आहे. ते धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस भवनच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
लोकशाहीवर विश्वास कसा ठेवायचा -राज्यपालांची सभागृहातील वेगवेगळी भूमिका पाहायला मिळाली. सगळी सत्ता मुठीत ठेवण्यासाठी आम्हीच देशाचे मालक आहोत असं चित्र निर्माण केलं जातंय. राज्यपालां सारखे व्यक्ती एका सभागृहामध्ये एक वर्षा पूर्वी वेगळी भूमिका घेतात. एक वर्षानंतर दुसरी भूमिका घेतात. राज्यपालसारखे व्यक्ती जर, अशी वागत असतील तर लोकांनी लोकशाहीवर विश्वास ठेवायचा कसा हा मोठा प्रश्न आहे असे, म्हणत पवार यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीवरून राज्यपालांवर टीका केली. सत्तेचा गैरवापर करत लोकांना धमकावले जातंय. त्या माध्यमातून एक वेगळं राज्य चालवल्याचा संदेश देशात दिला जातोय. अशा परिस्थितीत वाट्टेल ती किंमत मोजून आम्ही या देशाच्या लोकशाहीचे जतन करू. यासाठी सगळ्यांनी एकत्र येत आशा प्रवृत्ती विरोधात एकसंघ उभे राहण्याची गरज आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.
हेही वाचा -Chandrapur Shocking video : 166 सेकंदाची मृत्युशीं झुंज, पहा व्हिडिओ